सैफ अली खान म्हणतोय आय एम एव्हिड रिडर ! म्हणूनच अचानक उद्भवलेल्या ह्या ग्लोबल इशूजपुढे गुढगे टेकण्यापेक्षा ह्या वेळेचा सदुपयोग करावा म्हणून माझ्या घरच्या लायब्ररीमधील सगळी वैचारिक - पुस्तकं वाचण्याचा मी सपाटा लावलाय.
'The Perils of Being Moderately Famous ' हे पुस्तक मी कालच वाचून हातावेगळं केलं. हे पुस्तक माझी बहीण सोहाने लिहिलं आहे जे तिने लिहून ३ वर्षे झालीत. प्रत्येक वेळी ती मला रागे भरते, भाई आप मेरी बुक कब पढोगे ? पण वेळेअभावी हे जमून आलं नाही. जे आता मी वाचून काढलं आणि सोहाला फोन करून बधाई दिली.
सध्या माझ्या फिल्मचं शूटिंग कधी सुरु होईल ह्याचे प्लॅनिंग दिनेश विजन (निर्माता )कडून आलं नाही, सगळेच ह्यातून सावरण्याची वाट पाहत आहेत .