मूळ गाव बारामती आहे आणि पुणे येथे मी सध्या स्थायिक आहे.माझं७ वीपर्यंतचं शिक्षण फारसं चांगलं नव्हत आणि गावाकडे शेती हाच पारंपारिक व्यवसाय असल्यामुळे घरी सगळ्यांना वाटायचं कि मी शेतीच करेल पण ८ वीत गेल्यानंतर मला जाणीव झाली आणि मी अभ्यासाला लागलो. अन् पुढील शिक्षण बाहेर करायचे असे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. मला वाचनाची आवड असल्यामुळे मी खूप पुस्तक वाचली आणि याचा मला खुप फायदा झाला मला अनेक धडे पाठ्यपुस्तकात आले जे मी आवांतर वाचनात वाचलेली होती. आणि त्यामुळे शिक्षकांच्या देखील लक्षात आले कि मी हुशार विद्यार्थी आहे आणि त्यांनी माझ्याकडे छान लक्ष दिले.पुढे 9 वी च्या सुट्ट्यानंतर 10 विचा अभ्यास सुरु केला. आणि 10 सुरु झाली परंतु हे महत्वाचं वर्ष मी माझ्या आवडी निवडी जपत पार पाडलं अनेक खेळ खेळलो. खेळ आणि अभ्यासाचं उत्तम कॉम्बिनेशन बनलं होतं. आणि शिक्षकांचेही मार्गदर्शन मिळाले... कुठलाही ताण न घेता मी दहावीची परीक्षा दिली.... अन चांगल्या मार्कांनी पास झालो ज्यामुळे मला पुण्यात शिक्षणाची संधी मिळाली... मी बांधकाम व्यवसाय केला पुढे सरकारी नोकरी मिळाली परंतु ती सोडून स्वतःचा बांधकाम व्यवसाय करण ग्रुप नावाने सुरु केला. गेल्या २५ वर्षांपासून हा व्यवसाय उभा आहे. मुंबई,पुणे ,बारामती अश्या शहरात देखील माझ्या साईट्स सुरु आहेत...माझं दहावीच वर्ष महत्वाच ठरलं...
कल्याण तावरे, बांधकाम व्यवसायिक