वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील शिक्षिकेला भर चौकात पेट्रोल टाकून जाळल्यानंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबानी ज्या पद्धतीने आमच्या मुलीला वेदना होत आहेत. त्या पद्धतीने त्या मुलाला देखील वेदना व्हायला पाहिजेत असा संताप व्यक्त केला. अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी मॅक्स वुमन शी बोलताना दिली आहे.
रुपाली चाकणकर यांनी हिंगणघाट घटनेतील आरोपीला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीची शिक्षा द्या. अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
https://youtu.be/QISGlYAD8X4