अमरावतीच्या तिवसा मतदार संघांतील काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी पिकवीमा घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणा केली आहे. शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला. त्यांचा संबंध नसताना जर या प्रकरणात जर पवारांची चौकशी होणार असेल तर पीकविमा घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी. १०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या सर्व प्रकरणांची चौकशी व्हायला हवी असं देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या. एका कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या.
शरद पवार हे आघाडीचे नेते आहेत. त्यांनी ज्याप्रकारे आपलं राजकारण उभारलं आहे, ते शिकण्यासारखं आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, लढवय्या वृत्ती हे गुण घेण्यासारखे आहेत असंही ठाकूर म्हणाल्या.