(आयसीएसई) इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून यामध्ये मुंबईच्या जुही कजारिया देशात ९९.६० टक्के मिळवून सर्वप्रथम आली आहे. तर मुंबईच्या फोरम संजनवाला, अनुश्री चौधरी, अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याच्या यश भंसाली यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. त्याचबरोबर कोलकाताच्या देवांग कुमार अग्रवाल आणि बंगळुरुच्या विभा स्वामिनाथन या विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवून बारावीच्या परिक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
https://twitter.com/ANI/status/1125702822736142336