सेकंड लेडी असतानाही हे सर्वसामान्य व्यक्तीचं जगणं कौतुकास्पद आहे. त्याच बरोबर अमृता फडणवीस यांना त्यांचा अवकाश उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पुरोगामी कृतीशीलतेचे ही कौतुक आहेच. नाही तर आजवर राज्याच्या मिसेस मुख्यमंत्री माजघरात रांधा, वाढा, उष्टी काढा हीच भूमिका बजावत राहिल्या. किंवा डोक्यावरचा पदर सरकरणार नाही याची काळजी वाहत त्यांच्या मागे फरपटत राहिल्या. युरोप, अमेरिकेतील अनेक राष्ट्र प्रमुखांच्या पत्नी त्यांचं स्वतंत्र अस्तित्व घेऊन जगत असतांना आपण पाहत आलो आहोत. अनेक बाबतीत त्या राष्ट्रांच्या पुढारलेपणाचा दाखला देणारे आपण कधी पुढारणार आहोत? अमृतावहिणी, यांच्या सेल्फी वरून, त्यांच्या गाण्यावरून, त्यांच्या पेहेराव्यावरून टिंगल टवाळी करणाऱ्या सोशल मीडियावरील लोकांनी आपली पातळी दाखवली आहेच. अमृता फडणवीस, पंकजा मुंडे, स्मृती ईराणी यांच्यावर टीका करणारे एरव्ही पुरोगामीत्वाचे नगारे बडवत असतात. आपल्या नेत्याच्या महिला उदारीकरण धोरणाबाबत बोलत असतात. खरेतर फडणवीस फॅमिलीचे अभिनंदन च केले पाहिजे. महाराष्ट्राचे नेतृत्व नुसतेच पुरोगामी नाही तर कृतिशील असल्याचे यांनी दाखवून दिले आहे.फक्त एवढ्या बाबतीत, I support fadanvis family !!!