'पुतळा नाही पडळकर मी तुम्हाला समोर उभं करुन चपलेचा हाल घालेनं' - अश्विनी खाडे पाटील
शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला करोना, गोपीचंद पडळकर यांची खालच्या भाषेत टीका केल्यानंतर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षा अश्विनी खाडे पाटील यांनी पडळकरांवरच्या या वक्तव्यावर त्यांचा समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “सुरुवातीलाच मी महाराष्ट्राचे आधारवड शरद पवार साहेब यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका करणाऱ्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा जाहीर निषेध करते. पडळकर गेली 55 वर्षे महाराष्ट्रासाठी झगडणाऱ्या आमच्या बाप माणसाची तुम्ही माफी मागा. नाही तर बघा लोक तुमचा पुतळा जाळत आहेत पण मी तुम्हालाच उभं करून चपलांचा चा हार घालून उभं करेन. पडळकर आता तुझे राजकारण संपले.” अशी टीका अश्विनी खाडे पाटील यांनी केली आहे.