तृप्ती देसाईंनी वकिलामार्फत इंदुरीकर यांना पाठविलेल्या नोटिशीला इंदुरीकरांनी वकिलामार्फत लेखी उत्तर दिलं आहे. यावर बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, 'मी महिलांचा अपमान कधीही केलाच नाही, त्यामुळे मी महिलांची माफी मागणार नाही. तो मी नव्हेच असे इंदुरीकर यांनी उत्तर देऊन हात वर करण्याचा प्रयत्न केला आहे. तसचं इंदुरीकरांच्या समर्थकांनी माझी बदनामी केली, ठार मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्यावर सुद्धा इंदुरीकर यांनी त्या समर्थकांना मी ओळखत नाही, माझे कोणीही समर्थक नाही... असं उत्तर देऊन समर्थकांना सुद्धा तोंडघाशी पाडले आहे.'
परंतु महिलांचा कीर्तनातून वारंवार अपमान करणे, अपशब्द वापरणे, कीर्तनातून अंधश्रद्धा पसरवणे त्याचे सर्व व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध असून त्या पुराव्यांच्या आधारे पुढील लढाई आम्ही पुणे न्यायालयात लढणार आहोत. असे देसाई यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाल्या तृप्ती देसाई पाहा हा व्हिडीओ...