हैदराबाद येथे डाॅ. प्रियांका रेड्डीसोबत घडलेल्या घटनेनं देशभरात प्रचंड संताप व्यक्त झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. पीडित तरुणीचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. यामध्ये तीचं मृत्यू झाला. यामध्ये मुख्य आरोपीचं नाव मोहम्मद पाशा असल्याचं उघड झालं आहे. आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढली होती. दरम्यान आरोपी मोहम्मद आरिफ याने आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये यासाठी पीडित तरुणीचं तोंड दाबून ठेवलं. यावेळी श्वास घेऊ न शकल्याने गुदमरुन तीचा मृत्यू झाला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद, आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी आहेत. सोशल मीडियापासून ते सगळीकडेच याप्रकरणी आवाज उठवण्यात येत असून आरोपींना कडक शिक्षा केली जावी अशी मागणी होत आहे.
https://twitter.com/ANI/status/1200413499211411458?s=20