हैदराबाद एनकाउंटर : न्याय कधीही बदला असू शकत नाही – सरन्यायाधीश एसए बोबडे

Update: 2019-12-07 13:49 GMT

हैदराबाद एन्काउंटरच्या घटनेवर आज सरन्यायाधीश एसए बोबडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. हैदराबादमध्ये (Hyderabad) एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला जाळून ठार करण्यात आलं होतं. या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आरोप असलेल्या या चारही आरोपींचं पळून जात असल्याचं कारण देत पोलिसांनी एन्काउंटर केलं आहे.

त्यानंतर या आरोपींचं अशा पद्धतीने एन्काउंटर केल्यानं एककीडे आनंद व्यक्त केला जात असताना दुसरीकडे या आरोपींच्या अशा पद्धतीनं केलेल्या एन्काउंटर मुळे ‘कायद्याचं राज्य’ ही संकल्पना धोक्यात येईल. असं मत अनेक कायजेतज्ञांनी व्यक्त केलं आहे.

याच संदर्भात सरन्यायाधीश एसए बोबडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

जर बदल्याच्या भूमिकेतून मिळालेला न्याय नसतो. जर तुम्ही हा न्याय समजत असाल तर तो कधीही न्याय होऊ शकत नाही. जर बदल्याच्या भावनेतून हे केलं असेल तर न्यायाचं पावित्र्य संपवू शकतं. विशेष बाब म्हणजे सरन्यायाधीशांनी या संदर्भात कुठंही हैदराबाद एन्काउंटरचा उल्लेख केलेला नाही.जोधपूर मधील एका कार्यक्रमात देशात अलिकडं घडलेल्या घटनांवर बोलताना त्यांनी नव्या जोशाने जुन्या मुद्यांना छेडलं असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही की, गुन्हेगारी प्रकरणाचे खटले लवकरात लवकर संपवायला हवे. असं म्हणत सरन्यायाधीश बोबडे यांनी देशातील प्रलंबित खटल्याकडे लक्ष वेधलं. तसंच न्याय प्रणाली गतिमान व्हावी या संदर्भात देखील भाष्य केलं.

यासंदर्भात बोलताना पुढे ते म्हणालेमात्र, मला असं वाटत नाही की, न्याय ताबडतोब व्हायला हवा.. किंवा व्हायला पाहिजे. न्याय कधीही बदलत नाही. माझं म्हणणं आहे की, जर बदल्याच्या भूमिकेतून मिळालेला न्याय समजत असाल तर न्यायाचं पावित्र्य संपवू शकतं.

Similar News