भारतीय रेल्वेने महिलांसाठी खुशखबर आणली आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन महिलांसाठी आरक्षित डब्बा सुरु केला आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी महिलांची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी मेट्रो प्रमाणे आता ट्रेन मध्ये देखील पिंक कलरचा डब्बा आणला जाणार आहे. यामध्ये महिला एकट्या आणि लहान मुलांबरोबर प्रवास करू शकतात . याची सुरवात नार्थ फ्रंटियर पासून झाली आहे असं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.
https://twitter.com/PiyushGoyal/status/1156587283899965442?s=20