तुम्हाला एखाद्या लग्नकार्यासलाठी आमंत्रित केले गेले असेल अथवा तुमच्या परिवारामध्येच लग्नकार्य होत असतील तर हा काळ अगदी धावपळीचा असतो. आपल्याकडील लग्नसमारंभातील जेवणावळी अनेक गोड पदार्थांशिवाय अपुऱ्याच असतात. काही वेळा शरीराला विश्रांतीची गरज असते हे आपल्याला माहित असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. या समारंभांच्या गडबडीमध्ये आपल्या तब्येतीकडे होणारे दुर्लक्ष आपण नजरेआड करायचा प्रयत्न करतो , पण नंतर हेच दुर्लक्ष आपल्याला महागात पडते, आणि त्यातून आजारपण येते. पण या बाबतीत आपण थोडी काळजी सुरुवातीपासूनच घेतली तर ही लग्नसराईच्या काळातील धावपळ आपल्याला जड जाणार नाही. Courtesy : Social Mediaविशेषतः चायनीज , नूडल्स , अश्या पदार्थांच्या काऊंटर्सच्या भोवती नेहमी गर्दी पाहायला मिळते. ह्या पदार्थांकडे आपणही आकर्षित होतो. इतर जेवणाच्या जोडीने हे पदार्थ खाणे टाळू शकत नाही परिणामी पोट फुगणे, अपचन,, गॅसेस, अॅसिडीटी, पोट बिघडणे हे त्रास होऊ लागतात. त्यामुळे लग्नसमारंभात जेवताना, सर्व थोडे-थोडे पदार्थ खावे. आपला आवडता पदार्थ आपल्याला खायला मिळेल आणि आपले समाधान होईपर्यंत तो खाल्ला तर नको असलेल्या कॅलरीज आपल्या शरीरामध्ये जात असतात याचा आपण विचार केला पाहिजे. वेगवेगळ्या पदार्थांचा आपण लग्नामध्ये आनंद घेत असतो पण वाढलेल्या कॅलरीज कमी करण्यासाठी आवश्यक तो व्यायाम घेणे देखील आवश्यक असते. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील काही वेळ व्यायामासाठी द्यायला हवा. व्यायाम केल्याने शरीरामध्ये उत्साह येऊन मनही आनंदी राहते. व्यायामामुळे शरीराची पाचनशक्ती चांगली राहून त्यासंबंधीचे विकार होत नाहीत. या काळामध्ये स्वतःला ‘ हायड्रेटेड ‘ ठेवायला विसरू नका, भरपूर पाणी प्या. तसेच पाणी प्यायल्याने त्वचेची आर्द्रता टिकून राहत असते. पाणी पीत राहिल्याने भूकही नियंत्रणात राहील.