“आणखी किती दिवस चालणार हा कोरोना? आम्ही खायचं काय?”

Update: 2020-07-17 02:00 GMT

“आमची कामं बंद आहेत. आम्ही मजुरी करतो तेव्हा कुठं दोन वेळचं खायला मिळतं. जे शिल्लक होतं ते संपत आलंय आणखी किती दिवस चालणार हा कोरोना? आम्ही खायचं काय?” ही समस्या आहे औरंगाबादच्या मजरुरी करणाऱ्या महिलांची. लॉकडाउनमुळे रोजगार बुडाल्याने या महिलांन समोर कुटुंबाची चिंता निर्माण झालीय.

‘केंद्र व राज्य सरकार बेरोजगारांसाठी नवनवीन करोडो रुपयाच्या योजनांची घोषणा करीत आहे. मात्र आमच्या पर्यंत कुठलीही योजना पोहचलेली नाही. घराचे हप्ते आहेत, त्यातच भाज्या आणि किराणा मालाचे दर वाढत आहेत. आमच्या हाताला काम नसल्यानं या वस्तु घ्यायला सुद्धा आता आमच्याकडं पैसे नाहीत.’ अशी खंत या महिलांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे सरकार आता या मजुर वर्गासाठी कोणत्या उपाययोजना करतय त्यावर सर्व अवलंबून असल्याचं या महिलांचं म्हणणं आहे.

https://youtu.be/QaA34t7q3TQ

Similar News