अरबी समुद्रामध्ये कमी कमी दाबाच्या क्षेत्राने आता निसर्ग चक्रीवादळाने जागा घेतली आहे. पुढील 12तासात वाऱ्याचा वेग 100 ते 110 असेल आणि कधी कधी तो 120 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळ मुंबई च्या 430 किलोमीटर दूर आहे. तर गोव्यापासून 320 किलोमीटर दूर असल्याची माहिती हवामान तज्ञ शुभांगी भुत्ते यांनी दिली.
3 जून दुपारी नंतर हे वादळ अलिबाग जवळ जाण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं. अरबी समुद्रावर वादळाचा प्रभाव असताना या सर्व कालावधीमध्ये ठाणे पालघर, मुंबई, रायगड या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं शुभांगी भुत्ते यांनी सांगितलं.
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/240344500594952/?t=1