ड्रीम गर्ल हेमा मालिनीचा निवडणुकांसाठी थेट शेतातून प्रचार

Update: 2019-04-01 08:07 GMT

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी वेगवेगळ्या स्टाईलने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. मतदारांना आपल्याकडे कसे आकर्षित करता येईल यासाठी वेगवेगळी शक्कल लढविली जात असताना भाजपाच्या उत्तरप्रदेशातील मथुरा मतदारसंघातील लोकसभा उमेदवार उर्फ ड्रीम गर्ल अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अनोख्या पद्धतीने प्रचार सुरु केला आहे. थेट शेतातून प्रचार करुन शेतकऱ्यांशी संवाद साधू लागल्या आहेत.

रविवारी प्रचारादरम्यान गोवर्धन परिसरात हेमा मालिनी एका शेतात गव्हाचे पीक कापताना शेतमजूर महिलांसोबत दिसल्या. दरम्यान, यासंबंधीचे त्यांचे फोटो सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत आहेत. हेमा मालिनी यांनी 2004 मध्ये हेमा मालिनीने भाजपाध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्या 2003 ते 2009 या काळात राज्यसभेच्या सदस्य होत्या. 2014 लोकसभा निवडणुकीत हेमा मालिनी मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आल्या होत्या. त्यानंतर यंदाच्या 2019च्या निवडणुकीत पुन्हा त्यांना भाजपाने मथुरा याच मतदार संघातून रिंगणात उतरविले आहे.

पाहा हा व्हिडिओ...

Full View

 

Similar News