राज्य सरकार, सफाई कर्मचारी, पोलिस दल, वैद्यकीय विभाग सर्व मिळून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. शासनाकडून नागरिकांना सोशल डिस्टंसींग पाळण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत.
मात्र, मुंबईच्या मानखुर्द परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये या गोष्टी पाळणं म्हणावं तितकं सोपं नाही. लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे अशा क्षेत्रांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्यसेविका प्रत्येक व्यक्तीला गाठून अतिशय खालच्या स्तरावर काम करत आपलं अमुल्य योगदान देत आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये फिरुन त्य़ा जनजागृती करतात. प्रवास करुन आलेल्या व्यक्तींची चौकशी करुन दररोज त्य़ांच्यावर लक्ष ठेवून आहेत.