अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आज फादर्स डे च्या निमित्ताने ट्वीटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. पप्पा आणि तिचं नातं कसं आहे. जेव्हा पप्पा कामाच्या निमित्ताने बाहेर जायचे तेव्हा मला खूप वाईट वाटायचे.. पप्पांच्या गाडीमागे आम्ही वेड्या सारखे धावत पप्पा जाऊ नका असं बोलायचो. तेव्हा पप्पा आम्हाला मागे वळून देखील पाहायचे नाही कारण त्यांना आम्हाला सोडून जाताना खूप वाईट वाटायचे. त्यानंतर फोनवरुन ते आमच्या संपर्कात असायचे. त्यांच्याशी बोलण्यासाठी आम्ही तासंतास एसटडी फोनच्या इथं थांबायचो. असं सोनालीने सांगितले असून तिने एक गाणं देखील गायलं आहे. पाहा कोणतं गाणं म्हटलं सोनालीने तिच्या वडिलांसाठी…
https://twitter.com/mesonalee/status/1140089288924643328?s=12