मोगरा फुलला... मोगरा फुलला... या गाण्याची गायिका अर्थात सर्वांची आवडती सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिचा आज ३५ वा वाढदिवस... वयाच्या १६ व्या वर्षापासून श्रेया हिने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. श्रेयाला बालपणापासून गाण्यांचा शोक होता था. संगीताचं बाळकडू हे तिच्या आईकडून श्रेयाला मिळालं. बॉलिवूडमधील सर्वोत्त्कृष्ट गायिकांपैकी श्रेया घोषाल ही एक. श्रेयाच्या रोमांटिक गाण्यांचे अनेकजण चाहते आहेत. त्याचबरोबर श्रेयाचे सॅड सॉन्ग्स देखील खूप लोकप्रिय आहेत. हीचा जन्म 12 मार्च 1984 साली झाला. श्रेयाच्या वाढदिवसानिमित्त मॅक्सवुमन कडून खूप-खूप शुभेच्छा.