हॅप्पी बर्थडे राहुल गांधी

Update: 2019-06-19 09:14 GMT

आज राहुल गांधी यांचा वाढदिवस… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान मुंबईतही बुंधेलिया संस्थेतर्फे राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उर्मिला मातोंडकर यांनी लहान मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला.

१९ जून १९७० मध्ये जन्मलेल्या राहुल गांधी यांचा आज ४९ वा वाढदिवस आहे. भारतीय राजकारणातील सक्रिय आणि महत्वाचे नेते म्हणून ते ओळखले जातात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले राहुल गांधी मोदींविरूद्ध पंतप्रधान पदाची निवडणूक लढवत होते.

Similar News