दीर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर राज्यातील महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये खातेवाटप झाले. त्यानंतर सर्वांचेच लक्ष पालकमंत्रिपदाकडे होते. यामध्ये उद्धव ठाकरेंनी सरकारमधील मंत्री आणि राज्यमंत्र्यांची पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्ती केली आहे. ठाकरे सरकारमध्ये तीन महिला मंत्रींचा समावेश आहे . त्यामध्ये महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, नवनियुक्त राज्यमंत्री आदिती तटकरे आणि शाळेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या आहेत.
या यादीत रायगड चे पालकमंत्री पद आदिती सुनिल तटकरे यांना देण्यात आले. हिंगोलीचे पालकमंत्री पद वर्षा एकनाथ गायकवाड यां देण्यात आले. तर अमरावतीचे पालकमंत्री पद ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर यां देण्यात आले आहे.