धम्मशील सावंत
अतिवृष्टी व महापुराच्या (Flood) संकटात सापडलेल्या महाड (Mahad) करांचे दुःख व वेदना काही केल्या कमी होत नाहीत. घरातील पुराचे पाणी ओसरले मात्र डोळ्यातील अश्रूंचा पूर अजून तसाच आहे. येथिल पुराने संसार उध्वस्त केला. चौथ्या दिवशी देखील प्रशासनाची मदत महाड करांपर्यंत पोहचलेली नाही, येथील लोकांचे जीवनावश्यक साहित्य वाहून गेले. अनेकांना आपला जीव वाचला याचेच समाधान आहे. आजघडीला अन्न पाण्यावाचून हाल होत आहेत, बाहेरून येणाऱ्या मदतीकडे लोकांचे डोळे लागलेले आहेत. पुराच्या पाण्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सर्व परिस्थितिचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी....