Greta Thunberg : लाखो लोकांचं नेतृत्व करणारी 16 वर्षांची मुलगी

Update: 2019-09-22 05:32 GMT

मंबईतील आरे जंगलात मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीमुळे अनेक लोकांच्या पर्यवरणाविषयी संवेदना जागृत होत आहेत. अलिकडे लोक सोशल मीडियावर पर्य़ावरणाबाबत बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. सध्या अनेक अभिनेते, निसर्गप्रेमी सर्व सामान्य मुंबईकर आरे चे जंगल वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

वृक्षतोड झाल्यानं पर्यावरणाची कधीही न भरुण निघणारी हानी होते. हे आपल्याकडं येणारा पूर यातून लक्षात येतं. तर दुसरीकडे स्वीडनमध्ये अवघ्या 16 वर्षाच्या ग्रेटा थूनबर्ग या मुलीला पर्य़ावरणाचं महत्व समजल्यानंतर पर्य़ावरण वाचवण्यासाठी तिनं आंदोलन सुरु केलं. तिचं हे आंदोलन स्वीडनच्या संसदेच्या गेटच्या बाहेर पोहोचलं. ती प्रत्येक शुक्रवारी स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन करु लागली.

सुरुवातीला ती एकटीच होती. ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात होती. मात्र, लाख मैलाचा प्रवास करायचा असेल तर पहिलं पाऊल टाकायला हवं हे ग्रेटा नं जाणलं होतं. म्हणून तीनं हे आंदोलन एकटीनं सुरु केलं. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या या वाटेत आता हजारो माणसं तिच्या सोबत सामील झाली आहेत. तिने प्रत्येक शुक्रवारी सुरु केलेल्या या आंदोलनासाठी ती शाळा बुडू लागली.

मात्र, शाळा बुडवून आंदोलन करणाऱ्या या मुलीच्या आंदोलनाला ‘फ्रायडे फॉर द फ्युचर’ या नावाने ओळखले जाऊ लागले. केवळ स्वीडनमध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रेटाच्या या आंदोलनाची दखल घेतली गेली. हवामान बदलाबद्दल जागृती घडवणाऱ्या ग्रेटा ही, शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालेली सर्वात लहान मुलगी आहे.

अनेक देशांमध्ये ग्रेटा करत असलेल्या आंदोलनाची आणि कार्याची दखल घेतली. आत्तापर्यंत जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांसहित इतर १०० देशांमध्ये तिचे हे आंदोलन पोहोचले आहे. तिला जागतिक तापमानाबाबत बोलण्यासाठी ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’ मध्येही बोलण्याची संधी मिळाली. अशा या ग्रेटाला मॅक्सवूमनच्या शुभेच्छा

तुम्हाला ही बातमी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा...

पल्लवी पाटील

Similar News