सोळाव्या वर्षी 'ती' झाली टाइम पर्सन ऑफ दी इअर

Update: 2019-12-12 10:22 GMT

पर्यावरणाच्या बदलाने होणाऱ्या समस्येवर आवाज उठवणाऱ्या 16 वर्षीय स्वीडिश पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गने अवघ्या जगाचे लक्ष वेधले आहे. तीला बुधवारी टाईम मॅगझिनने २०१९ चं 'पर्सन ऑफ दी इयर' ने देखील गौरवन्यात आलं आहे. ग्रेटा थनबर्गला 'टाइम पर्सन ऑफ द इयर' या पुरस्काराने देखील गौरवन्यात आलं आहे. 16 वर्षीय ग्रेटा थनबर्गला याआधी देखील एमेन्सटी इंटरनॅशनलचा सर्वोच्च पुरस्कार, द राइट लाईव्हहूड पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्याचबरोबर ती आता टाइम मॅगजीनच्या कव्हर पेजवर झळकलेली आहे. हा बहुमान मिळवणारी ती पहिली तरुण व्यक्ती ठरली आहे.ग्रेटा थनबर्गने गेल्या वर्षी हवामानबद्दलच्या मोहिमेला सुरवात केली होती. स्वीडनच्या संसदेसमोर तिने निदर्शने केली. तिच्या या मोहिमेची जगभर दखल घेण्यात आली.

कोण आहे ग्रेटा थनबर्ग ?

१६ वर्षाच्या ग्रेटा थनबर्गला नोबेल पुरस्काराचा नामांकन मिळालं होतं. पोलंडमधील जागतिक परिषदेत भाषण करण्याचे मान देखील तिला मिळालेलं आहे. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारी ग्रेटा थनबर्ग अवघ्या काही महिन्यांत जगातील पर्यावरणीय चळवळीची आंतरराष्ट्रीय राजदूत झाली. स्वीडनमधील नवव्या इयत्तेतील मुलगी ग्रेटा थनबर्ग ही हवामानबदलाच्या बातम्या ऐकून अस्वस्थ होत असे.

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/293177498243458/?t=6

 

 

Similar News