सोलापुर मध्ये एका कार्यक्रमा दरम्यान कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावून आल्यानंतर सरकारवर कठोर टीका करत म्हटले की, “सरकारकडून लोकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणाऱ्या लोकप्रतीनिधींचा आवाज दाबला जातो. त्याचप्रमाणे त्यांना मेंटली टॉर्चर देखील केलं जात.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सरकारी रुग्णालयात महाग झालेल्या वैद्यकीय उपचारांची दरवाढ रद्द करा अशी घोषणाबाजी करत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना घेराव घातला होता. या दरम्यान धक्काबुक्की झाली त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्यासह 9 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यामुळे प्रणिती शिंदे यांना पोलिस ठाण्यात हजेरी द्यावी लागली. या प्रकरणी सरकार मुद्दाम मानसिक त्रास देत असल्याचं त्या म्हणाल्या. “तरीदेखील न्यायालयाचा मान राखून आणि कायद्याच्या चौकटीत राहून सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचा लढा आम्ही देतच राहू.” असे वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.