गोपीचंद पडाळकरांचे वक्तव्य डबक्यातील बेडकाच्या उडी प्रमाणे - सुरेखा ठाकरे
भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘महाराष्ट्राला लागलेला कोरोना’ म्हटल्या नंतर त्यांच्याविरोधात आता अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा ठाकरे पुढं आल्या आहेत. “पवारांबद्दल बोलताना आधी 10 वेळा विचार करावा लागतो परंतू गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य हे केवळ मी कसा मोठा होइल या भावनेनं पडळकरांनी केलेलं वक्तव्य हे निशेधार्थ आहे. हे एखाद्या डबक्यातल्या बेडका प्रमाणे केलेलं वक्तव्य आहे. जो कुठही निवडून नाही आला, अशा माणसाच्या या बोलण्यामुळं आपण कुणाला आमदारकी दिली याचं भाजपने आत्मचिंतन करावं” अशी प्रतिक्रीया सुरेखा ठाकरे यांनी दिली आहे.