महिलांच्या मतांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या कामिनी रॉय यांची आज १५५ वी जयंती आहे. यानिमित्ताने गुगल ने खास डूडल करून त्यांना आदरांजली वाहीली आहे.
कामिनी रॉय यांचा जन्म १२ ऑक्टोबर १८६४ साली बंगालच्या बाकेरगंज जिल्ह्यात झाला. बंगाली कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. ज्याकाळी समाजात कूप्रथांचा प्रभाव होता अशा बिकट परिस्थितीतही महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी फार संघर्ष केला होता.
कामिनी रॉय यांना लहानपणापासूनच गणिताची आवड होती. मात्र त्यांनी पुढे संस्कृत विषयात पदवी पूर्ण केली. स्वातंत्रपूर्व भारतातील त्या पहिल्या पदवीधर महीला आहेत.