टाटाचे कॅन्सरग्रस्त रुग्ण हिंदमातेच्या पुलाखाली

Update: 2020-02-04 04:23 GMT

कॅन्सरवरील (Cancer) उपचारांसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या टाटा मेमोरिअल रुग्णालयात (Tata Memorial Hospital) महाराष्ट्रासह विविध राज्यांतून शेकडो कर्करोगग्रस्त रुग्ण दाखल होतात. मात्र त्यांच्या राहण्याची कोणतीही व्यवस्था रुग्णालय, पालिका आणि राज्य सरकारकडून होत नसल्याने या रुग्णांना अखेर मुंबईच्या रस्त्यांवरच मुक्काम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मुंबईत नातेवाईक राहत असतील तर काही दिवस तिथे राहण्याची सोय होते. मात्र काही रुग्नांना तोही पर्याय नसतो.

उपचारासाठी रुग्णांसह आलेल्या कुटुंबीयांनाही अखेर हिंदमाता उड्डाणपुलाखाली आसरा घ्यावा लागतो आहे. मात्र त्यांच्या अडचणी इथेच संपत नाहीत. कॅन्सरशी झुंज देत असताना त्यांना आता मुंबई पालिकेकडुन होणाऱ्या त्रासाचाही सामना करावा लागतोय.

महानगर पालिका कर्मचारी रुग्णांचे कपडे आणि साहित्य घेऊन जातात…

हिंदमाता (Hindamata) पुलाखाली आसरा घेतलेल्या रुग्नांवर पालिकेकडून रोज कारवाई करण्यात येत आहे. या सर्व रुग्णांना दिवस ढकलणंही अवघड होऊन बसलयं. पालिकेकडून रोज त्यांचे कपडे आणि साहित्य उचलले जातात. किमान रुगन असल्याची जाणीव तरी ठेवावी अशी भावना रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत. आमच्या असह्य वेदना समजून घेण्याची विनंतीही त्यांच्याकडून करण्यात आली.

कॅन्सरग्रस्त रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ‘मॅक्समहाराष्ट्र’शी बोलताना आपल्या वेदना मांडल्या. पाहा हा व्हिडिओ…

 

Full View

Similar News