आरोपींना थर्ड डिग्री टॉर्चर करुन एन्काऊंटर केलं पाहिजे- आमदार प्रणिती शिंदे
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आलं असून हे ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. सकाळीच आलेल्या या वृत्ताची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे. याच प्रकरणावरुन सोशल मिडियावर अनेक हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. यावर आमदार हैदराबाद प्रणिती शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रिया
" पोलिसांचं अभिनंदन, मी त्यांना सलाम करते. पोलिसांवर ती एन्काऊंटर करण्याची वेळ आली. आता सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहावे. जेव्हा एकादी गोष्ट जास्त होते तेव्हा पोलिसांनी असं केलंय त्यामध्ये काही गैर नाही , सरकार आणि कोर्टाकडून देखील त्यांना शाबासकी दिली पाहिजे"
अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.
https://youtu.be/4QyBQj3HLsU