राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलीत पुन्हा आपली हिंदुत्वाविषयीची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी राज आपल्या भाषणातून हिंदुत्वाकडे जात असल्याचे स्पष्ट संकेतही दिले. राज ठाकरे यांच्या या नवीन भूमिकेमुळे सर्वच राजकीय स्थरातून चर्चा झाली. दरम्यान पुण्यात एका आयोजित कार्यक्रमापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना या कार्यक्रमात मनसेच्या नव्या झेंड्याबाबत प्रश्न विचारला असता
“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षासाठी नवीन दिशा ठरवली आहे आणि ते पुन्हा चांगल्या प्रकारे काम करतील,” त्याचबरोबर "माझ्यासारख्या शिवसैनिकाला खरा नेता पाहण्याची आणि त्यांना फॉलो करण्याची खूप इच्छा असते." आता आपल्याला खऱ्या नेत्यांची गरज आहे,
असं त्या यावेळी म्हणाल्या.