आज भारताचा ७१वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महिला सक्षमीकरणाची नेहमीच चर्चा होते मात्र आज याचं उदाहरण ही दिसून आलं. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना कधीकाळी शालेय विद्यार्थिनी म्हणून ध्वजसंचालनात सामील होता आलं होतं मात्र आज यशोमती ठाकूर यांना पालकमंत्री म्हणून मानवंदना स्वीकारण्याची संधी मिळाली. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी ध्वजारोहण केला. हा आपल्या आयुष्यातल हा सर्वांत भावूक क्षण असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/advyashomatiinc/status/1221319034311831552?s=21
.