भारतीय सैन्याच्या सैन्य पोलीस दलात शिपाई म्हणून पहिल्यांदा महिलांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती एक ऑगस्टला पश्चि दक्षिणेकडील पाच राज्यांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. आंध्रप्रदेश तेलंगाना कर्नाटक केरळ व तामिळनाडू या राज्यांसाठी भरती करण्यात येईल.सैनिकी पोलिसांच्या भूमिकेत पोलिसांच्या छावणी व सैन्य दलातील पोलिस बंदोबस्त, सैनिकांकडून नियम व नियमांचे उल्लंघन रोखणे, सैनिकांची हालचाल तसेच शांतता व युद्धाच्या वेळी रसद राखणे आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा सिव्हिल पोलिसांना मदत पुरवणे या कामांचा समावेश होतो.
सध्या महिलांना वैद्यकीय, कायदेशीर, शैक्षणिक, सिग्नल आणि सैन्याच्या अभियांत्रिकी शाखांसारख्या निवडक क्षेत्रात परवानगी आहे.बिपिन रावत यांनी काही वर्षांपूर्वी म्हटले होते की महिलांना ही जवान म्हणून सैन्यामध्ये घेण्यात येईल.