अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेले 10 महत्त्वाचे मुद्दे
देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या हातात आहे. देशात सध्या आर्थिक मंदीचं वातावरण आहे. निर्मला सितारामन यांनी शनिवारी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी गृह क्षेत्र व निर्यातदारांसाठी काही नव्या योजना जाहीर केल्या होत्या. याचवेळी त्यांनी महागाई नियंत्रणात येत असल्याचाही दावा केला. आर्थिक सुधारणा करण्यासाठी आत्तापर्यंत त्यांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्यानंतर काल त्यांनी तिसरी पत्रकार परिषद घेतली. काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हाउसिंग सेक्टर साठी महत्वाची घोषणा केल्या.
1. काल झालेल्या पत्रकार परिषदेत निर्मला सितारमण यांनी हाउंसिग सेक्टरसाठी 10 हजार कोटींच्या निधीची घोषणा केली. हा निधी 60 टक्के पूर्ण झालेल्या आणि निधी अभावी अडकून पडलेल्या घरांसाठी दिला जाणार आहे. फक्त यामध्ये घरांचा प्रकल्प एनपीए असावा.
2. सरकार घर खरेदी करण्यासाठी विशेष खिडकी योजना आमलात आणणार असून यातून लोकांना घर खरेदीसाठी मदत करण्यात येईल. यामध्ये एक्सपर्ट लोकांचा समावेश असणार.
3. निर्यात क्षेत्राला बुस्ट
निर्मला सितारमण यांनी निर्य़ात क्षेत्राला बुस्ट देण्यासाठी निर्यात करण्यासाठी लागणार वेळ कमी व्हावा म्हणून पावलं उचलली जाणार असल्याचं सांगितलं. निर्यात क्षमता वाढवण्यासाठी 36 ते 38 हजार कोटीचा निधी दिला जाणार.