केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा फोर्ब्सच्या जगातील १०० सर्वात पॉवरफुल वूमेनच्या यादीत समावेश झाला आहे. या यादीमध्ये जर्मन चांसलर अँजेला मर्केल (Angela Merkel) यांनी प्रथम स्थान पटकावले आहे. तर निर्मला सीतारामन यांना ३४ वे स्थान देण्यात आले आहे.त्याचबरोबर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या फोर्ब्सच्या जगातील १०० पॉवरफुल वुमनच्या यादीत पहिल्यांदाच समावेश झाला आहे. या यादीमध्ये महिला उद्योजक बायोकॉनच्या प्रमुख किरण मझुमदार शॉ यांचा ही समावेश आहे. गेल्यावर्षीपासून चर्चेत राहणारी पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी सोळा वर्षीय ग्रेटा थनबर्ग हीलाही फोर्ब्सने जगातील १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत स्थान दिले आहे. फोर्ब्सच्या यादीत इतर भारतीय व्यक्तींमध्ये 54 व्या स्थानावर रोशनी नादर मल्होत्रा आणि 65 व्या स्थानावर किरण मजुमदार शॉ यांचा समावेश आहे.
या आहेत जगातील सर्वात शक्तिशाली 10 महिला -
अँजेला मर्केल
क्रिस्टीन लागार्डे
नॅन्सी पेलोसी
उर्सुला वॉन डेर लेयन
मेरी बार
मेलिंडा गेट्स
अबीगैल जॉनसन
आना पेट्रीसिया बोटिन
गिन्नी रोमेटी
मारिलिन हेवसन