प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांना मिळावा मताधिकार आमदार श्वेता महाले यांची मागणी
देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. मोठ्या उत्साहात 71 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी २०१७ मध्ये केलेली सुधारणा रद्द करून पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्य निवड करण्यास व त्यादृष्टीने अध्यादेश प्रख्यापित करण्यात आला आहे. यामुळे शेतक-यांना मतदानाचा अधिकार आता संपुष्टात आला आहे. २०१७ मध्ये बाजार क्षेत्रात राहणाऱ्या किमान १० आर इतकी जमीन धारण करणाऱ्या आणि बाजार समितीमध्ये आपल्या कृषी उत्पन्नाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार देण्याची सुधारणा करण्यात आली होती. ती आता अध्यादेशाद्धारे रद्द करण्यात येईल. आमदार श्वेता महाले यांनी प्रजासत्ताक दिनी शेतक-यांना त्यांचा अधिकार देण्याचे आवाहन करत याची मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यांकडे केली असून “याआधी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला होता . परंतू तो अधिकार काढुन घेण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांनी शेतकऱी बांधवांना बाजार समितीमध्ये मतदानाचा अधिकार देण्यात यावा” असा ठराव घ्यावा अशी विनंती आमदार श्वेता महाले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यांकडे केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा अशी विनंती देखील आमदार श्वेता महाले यांनी केली आहे.