दहावीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात लेखक महेंद्र कदम यांचा ‘आजी: कुटुंबाचे आगळ’ हा पाठ मुलं शिकतात... काय म्हणतात महेंद्र कदम... “मला १० वीत ६०.१४ % मार्क्स होते. आणि आता माझाच पाठ दहावीची मुले शिकत आहेत. तुम्हाला सांगतो मार्क्स आजकालचा फुगवटा आहे. भाषाविषयात पैकीच्या पैकी मार्क्स कसे पडतात हेच मला कळत नाही. मार्कांच्या जाळ्यात अडकू नका. मार्क्स भरपूर मिळालेत म्हणून जमीन सोडू नका आणि कमी आलेत म्हणून निराश होऊ नका.. पुढे मोठे भविष्य आहे....”.