"दंगल गर्ल" गीता फोगट आई झाली!

Update: 2019-12-25 05:02 GMT

सुवर्णपदक विजेती, सेलिब्रिटी कुस्तीपटू गीता फोगट हिची संपूर्ण कहाणी आपण "दंगल" चित्रपटातून पाहिलीच आहे. या फिल्मला आता तीन वर्ष झाले असून गीता फोगटसाठी हा एक तोहफाच आहे गीता फोगटने एका गोंडस मुलाला जन्म दिला. गीताने पती आणि बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही बातमी सांगितली आहे. गीताने हा फोटो ट्विट करत त्याला एक कॅप्शनही दिलं आहे. ‘बाळा, तुझं या जगात स्वागत आहे. आम्ही किती प्रेमात आहोत. कृपया याला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद द्या. त्याने आमचं आयुष्य आता परिपूर्ण केलं आहे. आपल्या मुलाला जन्म देताना पाहण्याचा अनुभव शब्दात वर्णन करण्यापलिकडचा आहे’ अशा शब्दात गीताने ही बातमी दिली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी गीता फोगाट ही भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती.

https://twitter.com/pawankumar86kg/status/1209479830724440065?s=20

 

 

 

 

 

Similar News