कोरोना संकटामुळे देशातील करदाते आणि लहान-मोठे उद्योग अडचणीत सापडले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आज व्यावसायिक आणि व्यक्तींसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पाच लाखांपर्यंतचा आयकर परतावा तात्काळ देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा 14 लाख करदात्यांना होणार आहे.
त्याचबरोबर जीएसटी ( GST ) आणि अबकारी कराचे परतावे ही दिले जाणार आहेत. याचा थेट फायदा 1 लाख छोट्या व्यावसायिक आणि उद्योगांना होणार आहे. या संपूर्ण परताव्याची रक्कम 18000 कोटी इतकी होणार आहे.