दूरदर्शन वृत्तवाहिनीच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका मालविका मराठे यांचं आज निधन झालं आहे. १९९१ ते २००१ या काळात त्यांनी दूरदर्शनवर वृत्तविभागासाठी आपली सेवा प्रदान केली होती. दूरदर्शन वाहिनीच्या काही प्रसिद्ध वृत्तनिवेदिकांपैकी त्याही सर्वांच्या परिचयाचा असा एक चेहरा होत्या. बहुचर्चित कार्यक्रम ‘हॅलो सखी’साठी त्यांनी १२ वर्षाहून अधिक काळ अँकरींग केलं होतं.