लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी १९ मे रोजी झाले. यानंतर विविध वृत्तवाहिन्यानी एक्झिट पोल जाहिर करून त्यांनी एनडीएला बहुमत दिले आहे. त्यावर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी त्यांच्या कार्यर्त्यांना एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. या अफवा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी केलं जात आहे. त्यामुळे न डगमगता ,घाबरून न जाता मतमोजणी केंद्रांवर खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश ऑडिओमार्फत प्रियांका गांधीनी कार्यकर्त्यांना दिला.