यंदाची दिवाळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या मुंबईतील घरी साजरी करण्यास पसंती दिली आहे. राज्याचे मंत्री महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांना बहीण मानल आहे. त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीज निमीत्त जानकर पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचतात.
महादेव जानकर आणि पंकजा मुंडे यांच्यातील हे बहीण भावाचं नात गोपीनाथ मुंडे असल्यापासूनचं आहे. राजकारणात असूनही त्यांनी आपलं नात जपलं आहे. परळी मतदार संघात पंकजा मुंडे यांचे भाऊ राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे निवडून आले आणि पंकजामुंडे यांचा पराभव झाला आणि भाजपला मोठा धक्का बसला.
तर दुसरीकडे राजकारणातील बहीण भावाच नातं हे सख्ख्या नात्यापेक्षा निराळ असतं हे धनंजय मुंडे यांनी एका फेसबुक पोस्ट द्वारे दाखवून दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह पोस्ट केलेला फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. “मानलेलं असलं तरी रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नसतं भाऊ-बहिणीच अनमोल नातं,” अशी भावनीक पोस्ट धनंजय मुंडे यांनी करुन त्यांच्या नात्याला निर्मळतेची उपमा दिली आहे.
पंकजा मुंडे आणि महादेव जानकर तसेच धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्यातील बहीण भावाच नात पाहता राजकारणातील नाती ही वेगळीच असतात हे स्पष्ट होत.