नागराज मंजुळेंच्या ‘या’ आगामी चित्रपटात जेनेलीया?

Update: 2020-02-21 10:42 GMT

आपला सहजसुंदर अभिनय आणि मनमोहक हास्याने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या कामाचा अमीट ठसा उमटवणारी बॉलिवुड अभिनेत्री जेनेलीया डिसोजा-देशमुख (Jenelia D'soza) लवकरच मराठी चित्रपटातही काम करताना पाहायला मिळणार असल्याची जोरदार चर्चा सिनेसृष्टीत सध्या चालली आहे. 'जय हो' चित्रपटानंतर जेनेलीया चित्रपट सृष्टीपासून दूर राहिली. मात्र हल्ली तीचे आणि रितेशचे टिकटॉक व्हिडीओ फारच व्हायरल होत आहेत.

शिवजयंतीच्या निमित्ताने नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आणि रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांनी आपल्या आगामी शिवचरित्रपर चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात संगीतकार अजय-अतुल यांच्या सुरांची जादू आपणास पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटात जेनेलीयाला पडद्यावर पाहिल्यास नवल वाटू नये.

एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित... असं म्हणत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) जय़ंतीनिमित्ताने या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर ३८ सेकंदाचा ट्रेलर ट्वीट केला आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Similar News