भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही- मेहबुबा मुफ्ती

Update: 2019-12-05 10:41 GMT

मेहबुबा मुफ्ती आणि त्यांच्या मुलीने केंद्र सरकारवर मुस्लिमांना टार्गेट केलं जात या मुद्द्यावर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांनी नागरिकत्व विधेयकावरुन देखिल नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकत्व विधेयकावरुन त्यांनी भाजप सरकारवर टीका करत हे सरकार मुस्लिमांच्या विरोधात असल्याचं या विधेयकावरुन सिद्ध होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

मात्र हे ट्विट मेहबुबा मुफ्ती यांनी केलं नसून त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती हीने केलं आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी विधेयकावर पीडीपी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘भारत – मुस्लिमांना स्थान नसलेला देश’. जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आल्यापासूनच मेहबुबा मुफ्ती यांना ताब्यात ठेवण्यात आलं असून, त्यांची मुलगी इल्तिजा ट्विटरच्या माध्यमातून त्यांची भूमिका मांडत आहेत.

Similar News