एकविरा मंदिर ट्रस्टचे सदस्य व माजी आमदार अनंत तरे यांनी कोळी समाजाच्या वतीने आज विधानभवनात नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषद उपसभापती पदी नेमणूक झाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी आभार व्यक्त करत माझी जबाबदारी वाढली आहे. एकवीरा मातेने मला माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी शक्ती द्यावी. तसेच महिला सुरक्षेसाठी आज पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. खास करून लोकलने प्रवास करणार्या महिला प्रवाश्यांच्या सुरक्षासाठी प्रयत्न करणार आहे. असं त्यांनी म्हटल आहे.