पावसाळा संपला असला तरी अनेक जिल्ह्यामध्ये अजुनही पावसाची सावट आहे. यामुळे पिकांचे नुकसान होऊन शेकरी संकटात आले आहेत. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अनेक नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे.
“ऐन दिवाळीत राज्यातील शेतकऱ्यांचा घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला आहे. नवीन सरकारची औपचारिकता पुर्ण होण्याची वाट न पाहता केंद्र सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहिर करावी. हजारो कोटींचे हे नुकसान असून शेतकऱ्यांना नव्याने उभं करण्यासाठी असा पुढाकार केंद्र सरकारकडून अपेक्षित आहे.” असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
ऐन दिवाळीत राज्यातील शेतकऱ्यांचा घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला आहे.नवीन सरकारची औपचारिकता पुर्ण होण्याची वाट न पाहता केंद्र सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहिर करावी. हजारो कोटींचे हे नुकसान असून शेतकऱ्यांना नव्याने उभं करण्यासाठी असा पुढाकार केंद्र सरकारकडून अपेक्षित आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) October 30, 2019