आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर सोमवारी पुन्हा अंमलबजावणी संचालनालयापुढे (ईडी) गैरहजर राहिल्या. दरम्यान, कर्जवितरणात हितसंबध जपल्याचा आरोप कोचर यांच्यावर झाला आहे. ईडीने त्यांना याबाबत समजदेखील दिलं आहे. मात्र त्यांनी प्रकृतीचं कारण देऊन (ईडी) समोर गैरहजर राहील्या. याआधी देखील प्रकृतीचं कारण देऊन त्या गैरहजर राहिल्या. दरम्यान त्यांना पुन्हा एकदा समज दिली जाईल अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.