अभिनेत्री दीपिका पदुकोणनं पहिल्यादांच जेएनयूतील हल्ल्याप्रकरणी निषेध नोंदवला असून जेएनयू मध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आता बॉलिवूडमधील कलाकार समोर येऊ लागलेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण हीने काल जेएनयू मध्ये जाऊन हल्ल्याचा निषेध नोंदवला. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर काही गुंडांनी हल्ला केला. होता त्यात काही प्राध्यापकही जखमी झाले होते. काल संध्याकाळी दीपिकानं जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होत पाठिंबा दिला. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे करण्यात आलेल्या आंदोलनात सिनेसृष्टीतील दिग्दर्शक, कलाकार सहभागी झाले होते.