वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. मात्र, त्यांच्या समोर कोणीही तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्यानं या मतदार संघात होणारा मुकाबला हा एकतर्फी होणार आहे.
या मुद्य्याला घेऊन भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक विनोदी टि्वट करुन आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. शर्यतीत कोणच धावत नसताना पहिलं येऊन बाबांना कौतुक सांगणाऱ्या मुलाचा हा विनोद आहे.
मुलगा- बाबा मी शर्यतीत १ला आलो
बाबा- अरे वा मग २ रा आणि ३ रा कोण?
मुलगा- कोणी नाही मी एकटाच धावत होतो
वरळी मतदारसंघात
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) October 13, 2019