चिंताजनक: देशात एका दिवसात ५३४२ कोरोनाबाधितांची नोंद, एकुण रुग्ण १ लाखाच्या उंबरठ्यावर
देशभरात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. सोबतच पहिल्या दिवशीच्या कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झालेली चिंताजनक वाढ लॉकडाऊनची मर्यादा वाढवणं का आवश्यक आहे हे स्पष्ट करत आहे. गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे ५२४२ रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतची उचांकी वाढ ठरलीय. एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता ९६१६९ झालीय.
हे ही वाचा...
- Lockdown4: भुमीपुत्रांनो महाराष्ट्राला आत्मनिर्भर करा
- राहूल गांधींवर टीकेप्रकरणी सीतारमण यांना ‘या’ बॉलिबुड अभिनेत्रीचं उत्तर
- निर्मला सीतारमण यांचं वक्तव्य ऐकुन मला धक्काच बसला- अनिल देशमुख
देशात आतापर्यंत ३६,८२४ रुग्ण बरे झाले असून, हे प्रमाण ३८.२९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत २७१५ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्या ३,०२९ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि दिल्ली या चार राज्यांत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
गेल्या आठवड्याभरात ३ ते ४ हजाराच्या संख्येने रुग्णांची वाढ होत होती ती या आठवड्याच्या सुरुवातीलाच ५ हजाराने वाढली. लवकरच एकुण रुग्णसंख्या १ लाखाच्या पार होणार आहे.
राज्यात २,०३३ नवे रुग्ण
राज्यात सोमवारी करोनाचे आणखी २,०३३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ३५,०५८ वर पोहोचली. राज्यात सोमवारी ५१ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १,२४९ वर पोहोचली. राज्यभरात आतापर्यंत ८,४३७ रुग्ण बरे झाले आहेत.