कशी करतात कोरोना व्हायरस ची टेस्ट?

Update: 2020-03-22 02:44 GMT

राज्यात कोरोनो रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना दुसरीकडे या कोरोनो व्हायरसबाबत वेगवेगळे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळं लोकांच्या मनात अधिक भीती निर्माण होत आहे. सरकार ने अशा खोट्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. मात्र, अजुनही या पोस्ट व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर नुकताच एक संदेश व्हायरल झाला होता. या संदेशात कोरोनाच्या रक्त तपासणीसाठी महाराष्ट्रातील काही हॉस्पिटल्सची यादी व्हायरल झाली होती. मात्र, ही यादी खोटी असल्याचं नंतर समोर आलं. कोरोनो ची तपासणी करण्यासाठी रक्ताची तपासणी केली जात नसल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं.

मात्र, जगातील बहुतांश आजाराची तपासणी रक्तातून केली जात असताना कोरोनो व्हायरसची तपासणी रक्तातून केली जात नाही.

कशी केली जाते कोरोनो व्हायरस ची तपासणी?

कोरोनो व्हायरस ची तपासणी वेगळ्या पद्धतीने केली जाते. कोरोनो व्हायरस ची तपासणी करण्यासाठी रुग्णाच्या घशाचा द्रावा ची तपासणी केली जाते. सर्व प्रथम रुग्णाचा घशाचा द्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. नंतर या द्रावाची प्रयोग शाळेत तपासणी केली जाते. प्रयोग शाळेच्या अहवालानंतर सदर रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नेगेटीव्ह ठरवलं जातं. त्यामुळे कोरोनो व्हायरस ची तपासणी करण्यासाठी रक्ताची नाही तर घशातील द्रावाची तपासणी केली जाते.

Similar News