Coronavirus : लॉकडाऊन काळातही सोन्याचा उच्चांकी भाव

Update: 2020-04-09 12:08 GMT

लॉकडाऊन काळातही सोन्याचा उच्चांकी भाव , मात्र सराफ बाजार बंद , सेन्सेक्स मध्येही सुधारणा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे सुवर्णबाजारातील व्यवहार ठप्प आहेत. मात्र, मल्टी कमॉडिटी एक्सचेंज सुरूच असल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही सोने-चांदीचे दर वाढतच आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने-चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोन्याने ४५ हजार १०० रुपये प्रतितोळा तर चांदीने ४६ हजार रुपये प्रतिकिलोचा टप्पा गाठला आहे.

हे ही वाचा | 14 लाख करदात्यांना फायदा, परताव्याची रक्कम 18000 कोटी

विशेष म्हणजे, आठवडाभरात सोन्याच्या भावात ५ हजार ६०० रुपये प्रतितोळ्याने वाढ झाली आहे.

सोने-चांदीच्या दरावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम होत असतो. त्यात चीनमधून जगभरात पोहचलेल्या कोरोना विषाणूच्या प्रसाराचाही परिणाम महिनाभरापासून आहे. कोरोनामुळे गेल्या महिन्यात सुवर्ण बाजार अस्थिर होऊन दर कमी-जास्त होत आहेत. त्यानंतर लॉकडाऊनमुळे सुवर्णपेढ्या बंद आहेत. असे असले तरी मल्टी कमॉडिटी एक्सचेंज सुरूच आहे.

हे ही वाचा | माणुसकी तोकडी पडतेय का?- आरती आमटे

कोरोनामुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेत अनिश्चितता निर्माण झाल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत आहे. यात सराफ बाजारातील अर्थकारण बंद असले तरी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सौदे सुरू आहेत. कोरोना विषाणू पसरण्यापूर्वी सुवर्ण व्यावसायिकांनी जे सौदे करून ठेवले आहेत, त्यांची मुदत संपत आली की ते खरेदी अथवा विक्री करावे लागतात. त्यामुळे हे सौदे मुदत संपत आल्याने सुरू आहेत. याचा मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये मोठा फायदा घेतला जात आहे. सर्व उद्योग, व्यवसाय बंद असल्याने याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.Full View

Similar News